ut21.jpg
ut21.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

#Lockdown : मुख्यमंत्री आज काय निर्णय घेणार... 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नागरिक काळजी घेत नसल्याने राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांच्या ठिकाणी तर कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतही कोरोना वेगानं पसरतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात याबाबत प्रशासनाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुण्यात येत्या सोमवारपासून रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहा या काळात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २८ तारखेपर्यंत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत.

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लाँकडाऊन होणार का, काय बंद होणार लाँकडाऊन बाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आँनलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. 

हेही वाचा : पुण्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी
 पुणे : राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून विविध शहरांमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात येत्या सोमवारपासून रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहा या काळात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २८ तारखेपर्यंत जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत.  

सौरभ राव म्हणाले, "पुणे जिल्हयात रूग्णांचे प्रमाण १० टक्के आहे. हे प्रमाण पाहून त्यामुळे काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. येत्या २८ तारखेपरयत काॅलेज-शाळा बंद, खासगी शिकवण्या बंद राहणार आहेत पूर्वपरीक्षांचे क्लासेस ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून याबाबत शुक्रवारी पुन्हा आढावा घेण्यात येईल.  हाॅटेल, बार रात्री ११ वाजता बंद होतील. रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी (अत्यावश्यक सेवा वगळून)  लागू करण्यात आली आहे." 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT